माटरगाव ग्रामपंचायत मध्ये सरपंच यांच्या सासरे याना कंटाळून ग्रामपंचायत कर्मचारी रजेवर
मा. मुख्यकार्यपालन अधिकारी साहेब,
जिल्हा परिषद बुलडाणा.याना तक्रार करून कर्मचाऱ्यांनी मांडल्या व्यथा
१) श्री रविंद्र वसंत राऊत, पाणीपुरवठा कर्मचारी,
२ ) श्री विजेंद्र महादेव हिरडकार, ग्रा.पं. लिपिक
३) श्री महादेव समाधान घाटे, पाणीपुरवठा कर्मचारी,
४) श्री विष्णू जंगलू फूटवाईक, तात्पुरता सेवक.असून
: ग्रामपंचायत माटरगाव बु येथे ग्रामपंचायत चे सरपंच सौ. हिना फिरदौस तनवीर खान यांचे सासरे श्री इनायत उल्ला खान न्यामत खान माजी पंचायत समिती सदस्य यांच्याकडून अनावश्यक तथा दैनंदिन होत असलेल्या मानसिक त्रास देतात
तरी आम्हाला माटरगाव येथील सरपंच यांचे सासरे यांच्याकडून होणारा त्रास थांबवण्यात यावा आम्हाला आमची पगाराची थकबाकी देण्यात यावी. अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्य कार्यपालन अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली.
शेगाव तालुक्यात ग्रामपंचायत माटरंगाव बु ही मोठी ग्रामपंचायत असून त्यात १७ सदस्य आहेत, तसेच सरपंच सौ. हिना फिरदौस तनवीर खान ह्या महिला सरपंच आहेत ग्रामपंचायत ला सरपंच सौ. हिना फिरदौस तनवीर खान ह्या महिन्यातून एकच दिवस ग्रामपंचायत मासिक सभेला येतात. व या व्यतिरिक्त सरपंच सौ. हिना फिरदौस तनवीर खान यांचे सासरे श्री इनायत उल्ला खान न्यामत खान माजी पंचायत समिती सदस्य हेच ग्रामपंचायत ला येऊन बसतात व तेथील दैनंदिन कामकाजात सतत हस्तक्षेप करतात, कोणतेही कारण नसताना शिवीगाळ करणे तसेच अभद्र भाषेचा वापर करून बोलणे, सामाजिक व ग्रामपंचायत मधील कर्मचारी यांच्यातील आपसिक तणाव वाढविणे ह्या गोष्टी ग्रामपंचायत कर्मचारी सोबत दैनदिन झाले आहे . तसेच कोणतेही कारण किंवा अधिकार नसताना सतत चुकीची कामे करण्यास कर्मचारी यांच्यावर दबाव आणतात व तशी कामे केली नाही तर तुम्ही कामे करीत नाही, तुमची काम करण्याची वृत्ती नाही असे अभद्र भाषेत बोलतात व सेवेतून कमी करण्याची सतत धमकी देतात.
माटरगाव बु हे १२,००० लोकवस्तीचे गाव असून त्यात जर कर्मचारी यांनी कामे केली नसती तर गावात पाणीपुरवठा किंवा कार्यालयीन तसेच इतर कामे कशी झाली असती, असे आम्हाला सांगावे वाटते आमचे सर्व कर्मचाऱ्याचे मागील दोन वर्षांपासून चे वेतन व राहणीमान भत्ता सह थकित आहे, आम्ही वेळोवेळी वेतन मागणी केली असता त्यांनी देण्यास नकार दिला. तसेच मार्च २०२५ मध्ये आठवडी बाजार व गुजरी चे ४.५० लक्ष रुपये आले आहे तसेच ग्रामपंचायत ने वेतन देण्याची संमती दर्शविली होती परंतु सरपंच सासरे श्री इनायत उल्ला खा न्यामत खा यांनी वेतन देण्यास स्पष्ट नकार दिला.
आम्ही सर्व कर्मचारी आपल्याला विनंती करतो की, ग्रामपंचायत माटरगाव बु मध्ये सरपंच सासरे श्री इनायत उल्ला खान न्यामत खान यांना हस्तक्षेप न करण्यासाठी कायदेशीर रित्या योग्य त्या उपाययोजना कराव्या व आम्हाला यांच्याकडून वारंवार होणारा मानसिक त्रास थांबवावा व आम्हाला ग्रामपंचायत कडून थकित असलेले वेतन आणि राहणीमान भत्ता देण्यात यावा. आम्ही सर्व कर्मचारी आमच्याकडे उदरनिर्वाहासाठी दुसरे कोणतेही साधन नाही. मागील दोन वर्षांपासून वेतन थकित असल्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती अतिशय हालाखीची झालेली आहे. आम्हाला थकीत वेतन न मिळाल्यास आम्हाला बाहेर मजुरीसाठी जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
करिता माननीय साहेबांना विनंती आहे की. आम्हाला दैनंदिन होणारा मानसिक त्रास थांबवावा व आमचे दोन वर्षांपासूनचे थकित वेतन देण्यासंबंधी ग्रामपंचायत प्रशासनाला आदेश देण्यात यावे. असे खालील सह्या करणार कर्मचारी यांनी प्रशासनाला सादर केले आहे
माटरगाव येथील ग्रामपंचायत कर्मचारी
१) थी रविंद्र वसंत राऊत पाणी पुरोठा
२) श्री विजेंद्र महादेव हिरडकार ग्रामपंचायत लिपीक
३) श्री महादेव समाधान घाटे पाणीपुरवठा कर्मचारी
४) श्री विष्णू जंगलू फूटवाईक तात्पुरता सेवक

Post a Comment
0 Comments