Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

बांधकाम कामगारांच्या कामगार जन आक्रोश लढ्याला यश!


विशेष प्रतिनिधी मुंबई-महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समितीच्या आम्ही ट्रेड युनियन ऍक्ट १९२६ नुसार नोंदणीकृत ७४ कामगार संघटनेच्या वतीने  दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजता आझाद मैदान मुंबई येथे मान.सागर तायडे अध्यक्ष,मान.राजकुमार होळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि साथी काशिनाथ नखाते,आनंद भालेराव यांच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी कामगार जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. राज्यातील ३२ जिल्ह्यातील ७४ कामगार संघटना पदाधिकारी यांनी आपला सहभाग नोंदविला त्यात विनिता बाळेकुंद्री नवी मुंबई,प्रशांत मेश्राम अकोला,कमलेश दाभाडे संभाजीनगर,राजेंद्र सुतार कोल्हापूर,नितीन यादव सातारा,सुरेश पाटील मुंबई,शांतीलाल बोरुडे मुंबई,नंदकुमार महाडिक मुंबई,मंगेश माटे भंडारा गोंदिया,नितीन दवंडे हिंगोली,सरदार साब शेख लातूर,अशोक वाघमारे परभणी,शेख मोबीन शेख मेहबूब अकोला,मंगेश कांबळे रायगड,नितीन वाकोडे बुलडाणा,मोरेश्वर सुतार पंढरपूर,प्रदीप परकाळे सोलापूर,राजू जाधव नातेपुते,संजय जाधव ठाणे जिल्हा,अखिलेश दास मुंबई,रमाताई अहिरे,अतिव पाटील,रविराज सोनावणे,प्रभाकर शिंदे,सुधीर जाधव,चंद्रकांत गमरे अशा अनेक जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी कामगार जन आक्रोश मोर्चात लक्षवेधी सहभाग नोंदविला. 


       प्रमुख मागण्या.१ ) बांधकाम कामगारांचे कायद्यांतर्गत नोंदणीसाठी व लाभासाठीचे अर्ज (प्रस्ताव) ट्रेड युनियन ऍक्ट नुसार नोंदणीकृत कामगार संघटने कडून दाखल करून घेण्या बाबत सोबत महाराष्ट्र शासन आदेश दिनांक १५ सप्टेंबर २०१७ ची अंमलबजावणी करण्यात यावी.मंडळावर कामगार प्रतिनिधी घेण्यात यावे.२) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्गेत राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना द्यावयाच्या भेटवस्तू ऐवजी रोख रक्कम देणेबाबत महाराष्ट्र शासन आदेश दिनांक २६ मे २०१४ ची अंमलबजावणी करण्याबाबत.३) केंद्र शासनाच्या निर्णयानुसार "इ" प्रशासन धोरण लागू करण्याबाबत.४) तालुका कामगार सुविधा केंद्र महाभ्रष्टयुती आणि भ्रष्टाचारांची केंद्र झाली त्यामुळे ती तत्काळ बंद करण्यात यावी.५) कल्याणकारी मंडळाचे सोशल ऑडिट जाहीर झाले पाहिजे.६) कामगार संघटनेच्या प्रतिनिधी यांनी शासनाला व प्रशासनाला अनेक बनावट सही व शिक्के कॉपी पेस्ट करून रिनिवल व नवीन नोंदणी करीता आधार कार्डावरचा पत्ता बदलून मंडळामध्ये बोगस नाव नोंदणी रिनिवल झाले या संदर्भात अनेक पुरावे देऊन सुद्धा दक्षता समिती मार्फत संबंधित अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेऊन कार्यवाही केली नाही यासंबंधी जबाबदार संबंधित अधिकारी यांच्या कारभाराची चौकशी करून कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात यावी.७) कर्नाटक,राजस्थान राज्याच्या धर्तीवर नोंदणीकृत व लाभार्थी कामगारांची नांवे,गांव,रक्कम पोर्टल वर जाहीर करण्यात आली पाहिजेत तसेच मंडळाने ज्या ज्या गोष्टीचे बेकायदेशीर कंत्राट दिले ते सर्व कंत्राट ताबडतोब रद्द करण्यात यावे,8) कामगारांच्या आधार कार्ड ची दुरुस्ती ची वेबसाइट बाहेर चालू करावेत 9) ग्रामसेवक नगर परिषद महानगर पालिका प्राधिकृत अधिकारी यांचे 90 दिवस काम केले प्रमाण पत्र मिळत नाही गुत्तेदार ग्रामीण भागात नसतात त्याचं काय? याबाबत निर्णय घेण्यात यावा. 

मुख्य संपादक :- नितीन सूर्यभान वाकोडे 


कामगार जन आक्रोश कामगारांच्या लढ्याला यश!
महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांच्या भव्य मोर्चानंतर साथी काशिनाथ नखाते पुणे,आनंद भालेराव धाराशिव यांच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी कामगार जन आक्रोश मोर्चाचे शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाशजी फुंडकर यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी मंत्री महोदयांनी यांनी सर्व मागण्या सविस्तर ऐकून घेऊन त्यावर साधक बाधक चर्चा करत तात्काळ काही प्रश्न सोडवले तर उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.साथी काशिनाथ नखाते,आनंद भालेराव,प्रशांत रामटेके,रत्नपाल डोफे,ज्ञानेश्वर देशमुख सोलापूर,अजय कांबळे लातूर या शिष्टमंडळाने कामगार जन आक्रोश मोर्च्याचे नेतृत्व केले.प्रशांत मेश्राम यांनी सूत्रसंचालन केले तर रत्नपाल डोफे यांनी सर्व कामगार संघटना पदाधिकारी आणि किर्याशील कार्यकर्त्यांचे आभार मानले.

मा.सागर रामभाऊ तायडे. यांस कडून                                                                                                                               
 अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समिती.

Post a Comment

0 Comments