(शेगाव तालुका प्रतिनिधि ) जलंब गाव ते रेल्वे टेन्शन असलेल्या एक किलोमीटर अंतरावर उड्डाण पूलापासून ते स्टेशनपर्यंत स्वखर्चाने आणि स्वखुशीने विद्युत लाईट लावून रोषणाई करणाऱ्या आदरणीय श्री. राजेंद्र डौलकार यांचे गावकऱ्यांकडून मनापासून हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे १००% अपंग असले तरीही त्यांनी हे दैवी कार्य एकट्याने पार पाडले, ज्यामुळे गावकऱ्यांसह रात्री रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.जलंब गावातील खूप कामगार हे खामगाव जलंब अपडावुन करतात आणि खामगाव रेल्वे स्टेशनवर रात्री अंधारात येतात तसेच रेल्वेनी येणाऱ्या प्रवाशांना आता सोयीची वातावरण मिळेल. श्री. डौलकार हे जलंबचे निवासी असून, त्यांच्या या स्वयंस्फूर्तीने केलेल्या चांगल्या कामामुळे गावाचा सन्मान वाढला आहे. गावकरी म्हणतात, "हे खूप चांगले काम आहे. अपंग असूनही त्यांनी स्वखर्चाने हे साध्य केले, यासाठी आम्ही त्यांचे मनापासून कौतुक करतो."या रोषणाईमुळे गावातील कामगारांना आणि रेल्वे प्रवाशांना रात्रीचा प्रवास सुरक्षित होईल, तसेच स्थानिक विकासाला चालना मिळेल. गावकऱ्यांनी श्री. डौलकार यांचे आभार मानले आणि अशा चांगल्या उपक्रमांसाठी प्रोत्साहन दिले.तसेच आता गावात शिरनार्या मुख्य रस्त्या वरिल स्टेट लाईट हे कित्येक दिवसा पासुन बंध आहे या अंधाराचा फायदा घेऊन चोरांचा धुमाकूळ होण्या आधी ग्रामपंचायत प्रशासन मुख्य रस्त्यावर लाईट लावणार का हा प्रश्न गावकर्याना पडला आहे ..
मुख्यसंपादक :- नितीन सूर्यभान वाकोडे ९९७५९६९२०५

Post a Comment
0 Comments