Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

रेल्वे पुलाचे बांधकामामुळे चांगेफळ ते जलंब खामगांव राज्यमार्ग बंद; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

 बुलढाणा, दि. 20 (जिमाका) : चांगेफळ, भेंडवळ, भास्तन, माटरगांव,

जलंब खामगांव राज्यमार्ग क्र.222 रस्त्यावर कि.मी. 12/400 (नविन कि.मी. 29/600) जलंब गावाजवळ रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम सुरु आहे. पुलाच्या ठिकाणी पर्यायी शासकीय जागा उपलब्ध नसल्यामुळे वाहन मार्ग सुध्दा देता येणे शक्य होत नाही. त्यामुळे वाहन धारकांचे व जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन पुढील दोन महिन्यांपर्यंत रस्त्यावरुन वाहतुक पुर्णपणे बंद ठेवून पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.

चांगेफळ भेंडवळ भास्तन माटरगांव जलंब खामगांव राज्यमार्ग क्र.222 वरील वाहतूक बंद करुन खामगांव राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 लांजुड खोलखेड राज्यमार्ग क्र.222 ला जोडणारा रस्ता (प्रमुख जिल्हामार्ग क्र. 50 व प्रमुख जिल्हामार्ग क्र. 7) या पर्यायी मार्गाचा वापर करुन सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

 

जलंब येथील उद्दान पूल चे रेल्वे क्रॉसिंग चे काम चालू होत त्या मुळे जलंब रेल्वे गेट हा २ महिने बंद राहणार आहे त्या साठी पर्यायी मार्ग लांजूड माटरगाव असा देण्यात आला आहे तरी या मार्गवरील नागरिकांनी नोद घ्यावी. ....!! 

मुख्य संपादक नितीन वाकोडे   मो  9975969205 

Post a Comment

0 Comments