दिनांक २८ मे २०२५ रोजी व्यकंटेश सभागृह मंगरुळपिर येथे बिल्डिंग पेंटर बांधकाम व इतर असंघटित मजूर संघ या संघटनेच्या वतीने दहावी बारावी मध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला व कौशल विकास अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या कामगारांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष चंद्रकांत दादा ठाकरे हे उपस्थित होते संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत मेश्राम,कोषाध्यक्ष आत्माराम साठे,कामगार संघटक चे उप संपादक नागेश नेमाडे,मनिष नेमाडे सर,बजाजजी,सचिन खराटे अकोला ग्रामिण अध्यक्ष हे पण प्रमुख पाहुणे हजर होते वाशिम जिल्ह्याचे बांधकाम संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शेख युनूस पण उपस्थित होते तालुका महिला अध्यक्ष मोहोड मॅडम उपस्थित होत्या
या गुणगौरव सोहळ्याच्या प्रसंगी सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि जिल्हा परिषद चे माजी जिल्हा अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे यांनी आपल्या भाषणांमधून सांगितले की या संघटनेला माझ्या कडून जेवढं सहकार्य होईल तेवढं मी करेल आणि या संघटनेला समोर नेण्यासाठी मी सदैव तत्पर असेल या संघटनेच्या ज्यापण मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याची मी पूर्ण प्रयत्न करेल अशी शाश्वती त्यांनी यावेळी जिल्हा शाखा संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिली आपल्या भाषणामधून त्यांनी हे पण सांगितले की आत्तापर्यंतच्या कामगारांच्या समस्या आहेत त्या आम जनतेचे पिळवणूक करण्याचं काम करतात त्यांना ही संघटना मजुरांना न्याय मिळवून देण्याचं काम करते म्हणून मी या संघटनेच्या पाठीशी सदैव आहे. या प्रसंगी विद्यार्थी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मनिष बेलोंडे सर जिला सचिव अजमत खान उपाध्यक्ष गोपाल वानखडे उपाध्यक्ष वाजीद अंसारी सहसचिव अ,गनि ठेकेदार संपर्क प्रमुख संदिप हरीहर संघटक अजमत भाई सल्लागार रमेश विश्वकर्मा ऐंड,दानीश खान मोहम्मद नाज़ीम अ,अलिम दिलावर खान मोहम्मद वाजीद अ,खालीक भाई वाजीद मनीयार आदि उपस्थित होते



Post a Comment
0 Comments