मुख्य संपादक नितीन वाकोडे मो 9975969205
शेगाव तालुका प्रतनिधी
विद्यमान तहसीलदार साहेब शेगाव यांच्या मार्गदर्शनानुसार आज माटरगाव मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर घेण्यात आले सदर शिबिरामध्ये विविध प्रकारचे दाखल्याचे वाटप करण्यात आले शेतकऱ्यांनी विविध तक्रारी अर्ज विनंती अर्ज सदर दाखल केले सलोखा योजना संजय गांधी योजना श्रावणबाळ योजना ई चावडी ई हक्क प्रणाली निस्तार पत्रक वाजिब उल अर्ज माहिती देण्यात आली जिवंत सातबारे चे वाटप करण्यात आले शिबिरामध्ये एकूण 300 ते 350 लोकांनी सहभाग नोंदवला सदर शिबिरामध्ये विविध विभागाचे विविध दाखले एकूण 279 वाटप करण्यात आले मंडळातील मंडळ अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार तलाठी व कोतवाल यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी करण्यात आला

Post a Comment
0 Comments