** पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूल माटरगाव बुद्रुक तालुका शेगाव येथे नवीन मुलांचे पुष्पगुच्छ व पुस्तक ड्रेस देऊन स्वागत
मुख्य संपादक कामगार संघटन नितीन वाकोडे
पि एम श्री जिल्हा परिषद हायस्कूल माटरगाव बुद्रुक येथे 23/06/2025 रोज सोमवारला नवीन व जुन्या विद्यार्थ्यांचा सत्र 2025-26 मध्ये प्रवेशोस्तव सोहळा साजरा करण्यात आला.सर्व प्रथम विद्यार्थ्यांचे पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूल विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापक कैलास पवार यांच्या हस्ते औक्षण ,फुल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शाळा समिती अध्यक्ष गणेश सपकाळ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात गोड जेवण देण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक पवार सर कन्नड सर सर मोहळ सर कुलकर्णी सर शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते व त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सूत्रसंचालन कुलकर्णी सर यांनी केले

Post a Comment
0 Comments