राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जानेवारी २०२६ पासून ते डिसेंबर २०२६ पर्यंत अनेक ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपतो आहे. अशा मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची तरतूद करण्यात आली आहे.
याबाबतचे एक पत्रक २३ जानेवारी रोजी निर्गमित करण्यात आले आहे. याच मंजुरीच्या अधीन राहून राज्यामध्ये जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ मध्ये या कालावधीत मुदत संपणाऱ्या याचप्रमाणे निवडणूका होऊन नवनिर्मित ग्रामपंचायतीवर नियमानुसार ग्रामपंचायत अस्तित्वात येईपर्यंत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
आणि याच अनुषंगाने उच्च न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेऊन राज्यामध्ये जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ पर्यंत ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपेल किंवा नव्याने निवडणूक होईल. त्यावर जोपर्यंत सदस्य निवडून येत नाहीत, ग्रामपंचायत अस्तित्वात येत नाहीत, तोपर्यंत प्रशासक नेमण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
याच संदर्भातील एक महत्वाचं पत्र राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अवर सचिव महाराष्ट्र यांच्याकडून देण्यात आले आहे. त्यानुसार आता संबंधित ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
मुख्यसंपादक :- नितीन सूर्यभान वाकोडे ९९७५९६९२०५

Post a Comment
0 Comments