Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कामगार अधिकारी यवतमाळ यांना दिले जनवादी कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आले निवेदन

 -

-

कामगार अधिकारी यवतमाळ यांना दिले जनवादी कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आले निवेदन


  यातमाळजिल्हा प्रतिनिधीसरकारी कामगार अधिकारी,सरकारी कामगार अधिकारी कार्यालय,प्रशासकीय इमारत दुसरा माळा,जिल्हाधिकारी कार्यालय परिसर यवतमाळ,येथीलरत्नपाल गोवर्धन डोफे ( अध्यक्ष ) जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटना,  ता.बाभुळगाव जि. यवतमाळ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध संच (किट) वाटपाबाबत व यवतमाळ जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत.विषयान्वये, 'जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटना' या पत्राद्वारे आपले लक्ष खालील महत्त्वपूर्ण मुद्द्यांकडे वेधत आहे:महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्या मार्फत राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात.सद्यस्थितीत वर्धा, चंद्रपूर आणि राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये कामगारांना 'गृह उपयोगी वस्तू संच', 'सुरक्षा संच', 'अत्यावश्यक संच' तसेच 'आर.ओ. (RO) वॉटर प्युरिफायर' आणि 'कोटी' (जॅकेट) इत्यादींचे वाटप जोमाने सुरू आहे अत्यंत खेदाची बाब अशी की, यवतमाळ जिल्ह्यातील हजारो नोंदणीकृत बांधकाम कामगार या लाभांपासून अद्यापही वंचित आहेत. जिल्ह्यात या साहित्याच्या वाटपाबाबत अद्याप कोणतीही ठोस हालचाल किंवा नियोजित कार्यक्रम दिसून येत नाही.मीजिल्हयातील कामगार वारंवार कार्यालयात चकरा मारत असून त्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत, ज्यामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होत आहे. आमच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:इतर जिल्ह्यांप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातील पात्र कामगारांना त्वरित सर्व प्रकारच्या संचांचे (किट) वाटप सुरू करावे.वाटप प्रक्रियेत पारदर्शकता असावी आणि त्याचे वेळापत्रक जाहीर करावे.प्रलंबित असलेले इतर शैक्षणिक व आरोग्यविषयक लाभ त्वरित मंजूर करावेत.तरी, प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊनतातडीने कार्यवाही करावी.  येत्या सात दिवसाच्या आत वाटप सुरू करण्यात यावे,अन्यथा, संघटनेच्या वतीने कामगारांच्या हक्कासाठी आपल्या कार्यालयात केबिनमध्ये दिनांक ०२ एप्रिल २०२६ रोजी ठीक १२.०० वाजता कामगारांना सह मोठ्या संख्येने ठिय्या आंदोलन करण्यात येईल, याची दक्षता घ्यावी, या आंदोलनामध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदारी आपल्या विभागाची राहिली याची कृपया नोंद घ्यावी असे निवेदन 27/3/2026रोजी देण्यात आले त्याच्या 

प्रतिलिपी:- १) मा. जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना माहितीसत्व सविनय सादर,

२) मा. जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ यांना माहितीसत्व सविनय सादर,

Post a Comment

0 Comments