Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जलंब-माटरगाव परिसरात निमगाव नारखेड मार्गे अवैध गुटख्याची मोठी वाहतुक..!

  

*जलंब / माटरगाव, जि. बुलढाणा | 5 जुलै 2026*  
*जलंब-माटरगाव परिसरात निमगाव नारखेड मार्गे अवैध गुटख्याची मोठी वाहतुक अवैध गुटखा* 
 धंदा जोमात! पोलिस व अन्न व औषध प्रशासन गप्प का? 

जलंब आणि माटरगाव परिसरात प्रतिबंधित असूनही अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा विक्री धंदा चांगलाच जोमात सुरू आहे. किराणा दुकाने, पानटपऱ्या आणि हॉटेल्सच्या मागे उघडपणे गुटख्याची विक्री होत असून, प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

शाळांजवळही सर्रास विक्री"
स्थानिकांच्या माहितीनुसार, शाळा-कॉलेजच्या आसपासही अल्पवयीन मुलांना सहज गुटखा मिळतो*. 10-20 रुपयांच्या पुड्या प्लास्टिक पिशवीत लपवून विकल्या जात आहेत. काही ठिकाणी तर *"मागणी नुसार  टू-व्हीलर गाडीने घरपोच डिलिव्हरी"* देखील केली जाते.टू-व्हीलर वाले खुले आम गुटखा घेऊन माटरगाव जलंब परीसरात फीरतात

> *"पोलिसांची गस्त येते, 2 दिवस बंद राहते, नंतर पुन्हा जोमात सुरू होते. वरून हप्ते जातात का काय माहिती"*, अशी संतप्त प्रतिक्रिया एका ग्रामस्थाने दिली.

*कायद्याचा धाक नाही*
महाराष्ट्रात *गुटखा, पान मसाला विक्रीवर संपूर्ण बंदी* असतानाही जलंब-माटरगाव परिसरात  पोलिस व अन्न व औषध प्रशासनाची  कारवाई होत नसल्याने* विक्रेत्यांचे धाडस वाढले आहे. यामुळे तरुणांमध्ये तंबाखूचे व्यसन मोठ्या प्रमाणात पसरत आहे.

 मुख्यसंपादक :- नितीन सूर्यभान वाकोडे ९९७५९६९२०५    



Post a Comment

0 Comments