Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

बिल्डिंग पेंटर बांधकाम व इतर असंघटित मजूर संघाचा कामगार महामेळावा अकोला येथे संपन्न


 अकोला प्रतिनिधी..आज अकोला येथे बिल्डिंग पेंटर बांधकाम व इतर असंघटित मजूर संघाचा कामगार महामेळावा अकोला म. न. पा शाळा नं 7येथे पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अब्दुल बशीर भाई, संघटनेचे उपाध्यक्ष होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख उदघटक अकोला पश्चिम चे लोकप्रिय आमदार मा. साजिद खान पठाण (बांधकाम कामगार सनियंत्रण समिती अध्यक्ष )व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मां राहुल काळे साहेब (कामगार आयुक्त )मां महेंद्र जाधव (सरकारी कामगार अधिकारी )उपस्तित होते तसेच मां निलेश केवटजी आर. टी.आय (पिंपरी चिंचवड अध्यक्ष )मनोज सापेकर धामणगांव आर. टी. आय कार्यकर्ता, शेख नासिरभाई कारंजा आर. टी. आय कार्यकर्ता, नितीन वाकोडे राज्य संघटक बुलढाणा, गौतम उबाळे केंद्र सदस्य वंदनाताई वासनिक (माजी नगरसेविका अकोला ), अरुणा लबडे मॅडम (घरेलू कामगार संघटना ), युनूसभाई (जिल्हाध्यक्ष वासीम )ईश्वर चराटे बुलढाणा गणेश मोरे बुलढाणा जिल्हा सचिव राजू जाधव सिंदखेड राजा .अशपाक शहा कारंजा रोणक अली .महेंद्र कांबळे लातूर जिल्हाद्यक्ष   सेफुद्दीन काजी उपस्तित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण व प्रमुख पाहुण्यांचा परिचय नितीन भाऊ वाकोडे यांनी करून दिला, या कार्यक्रमामध्ये निलेश केवट सर यांनी माहितीचा अधिकार कसा वापरायचा व त्यांनी अटल बांधकाम घरकुल योजना कशा प्रकारे मिळवली त्यांना झालेला त्रास व त्यातून त्यांनी कसा पाठपुरवठा केला हे त्यांनी सर्व कामगारांना समजावून सांगितले. व वंदना वासनिक ताईने कामगारांना साठ वर्षाचे झाल्यावर कोणती योजना मिळते हे समजावून सांगितले तसेच मनोज सापेकर सरांनी मुंबई मध्ये जाऊन कामगार बोर्डात कामगार आयुक्त यांना घरकुल बाबत पाठपुरावा केला हे सांगितले संनियंत्रण समिती कशी रद्द केली सांगितले, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भाऊ मेश्राम यांनी कामगार बोर्डाची स्थापना केव्हा झाली व कामगारांचे प्रश्न यांच्यावर संपूर्ण माहिती दिली व शेवटी अध्यक्ष भाषण अब्दुल बशीर भाई यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी बनविण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी विनोद जपसरे महासचिव, मनोज बाविस्कर सचिव, आत्माराम साठे कोषध्यक्ष, अब्दुल जमील केंद्रीय सदस्य, सुरेश कारंडे संघटक, गणेश सावळे प्रसिद्धी प्रमुख, झिंगाजी पुंडगे महानगर उपाध्यक्ष, संतोष भालेराव, नागेश नेमाडे ग्रामीण अध्यक्ष, सय्यद मकसूद आदिनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन    सत्यशिल बावनगडे यांनी केले हे  यांनी केले तर आभार प्रदर्शन विनोद जपसरे यांनी केले 

Post a Comment

0 Comments