जिल्हा:प्रतिनिधी
शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथे अज्ञात चोरट्यांनी घराचे कडी-कोंडे व कुलूप तोडून घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत घरातील सुमारे २ लाख रुपये रोख रक्कम आणि अंदाजे ५ तोळे (५० ग्रॅम) सोन्याचे दागिने, असा एकूण सुमारे ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे फिर्यादीने सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव गजानन भालदाने (वय ३०, रा. पहुरजिरा, ता. शेगाव, जि. बुलडाणा) हे आपल्या कुटुंबासह घरातील हॉलमध्ये झोपले होते. दरम्यान, दि. ८ ऑगस्ट रोजी रात्री ११.३० ते ९ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील दोन्ही बेडरूमचे कडी-कोंडे व कुलूप तोडले. त्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाटांचे लॉक तोडून कपाटात ठेवलेली अंदाजे २ लाख रुपयांची रोकड व ५ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी पोलीस स्टेशन जलंब येथे कायम अप क्रमांक २४४/२०२६, कलम ३०५ (अ), ३३१ (४) BNS अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.४४ वाजता दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास ठाणेदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजीव मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आला असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोहेकॉ राजेश हिवाळे (ब.नं. ५५२) यांनी केली.
मुख्यसंपादक:- नितीन सूर्यभान वाकोडे ९९७५९६९२०५

Post a Comment
0 Comments