बुलढाणा :- स्थानिक जिजामाता महाविद्यालय, बुलढाणा येथील इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. नामदेव वा. ढाले यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास संशोधक विद्यार्थी रुपेश भगवान कंकाळ यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. जिजामाता महाविद्यालय येथे प्राचार्य डॉ. नितीन चांगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी ओपन डिफेन्स वायवा आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य
प्रा.डॉ.जे.जे. जाधव जिजामाता महाविद्यालय बुलढाणा, विषय तज्ञ डॉ. सुरेश माळशिखरे SPM महाविद्यालय चिखली व परीक्षक म्हणून प्रा. डॉ. मारुती जाधव धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर, जि, जळगाव यांन परीक्षण केले.IQAC समन्वयक प्रा.डॉ. सुबोध चिंचोले, डॉ. संजय साळवे जिजामाता महाविद्यालय बुलढाणा प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू इतिहास संशोधक विद्यार्थी रुपेश भगवान कंकाळ यांनी "भारतातील टाटा उद्योगसमूहाच्या कार्याची ऐतिहासिक मिमांसा (कालखंड इ. स. १८६८ ते २०१२") या विषयावर इतिहास संशोधन करून आचार्य पदवी प्राप्त केली. मार्गदर्शक, परीक्षक व विषय तज्ञ यांच्या उपस्थितीत त्यांना आचार्य पदवी प्रदान करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. यावेळी डॉ उमेश राऊत, अनिकेत गावंडे, प्रदीप बानाईत, प्रा. यजुवेंद्र राजपूत इत्यादी इतिहास संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमांती संशोधक विद्यार्थी रुपेश भगवान कंकाळ यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांच्या अर्धांगिनी सौ नेहा रुपेश कंकाळ व संपूर्ण कंकाळ परिवार उपस्थित होता, रुपेश भगवान कंकाळ यांनी आपल्या यशाचे श्रेय वडील स्व. भगवान कंकाळ, आई गंगासागर कंकाळ व आप्तस्वकीय यांना दिले आहे त्याचप्रमाणे तुषार काचकुरे, श्रीकांत खिर्डेकर, निलेश गायकवाड व इतर मित्रपरिवार, महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* कामगार संघटक न्यूज परिवार तर्फे श्री रुपेशभाऊ भगवान कंकाळ यांना मानपूर्वक हार्दिक अभिनंदन !

Post a Comment
0 Comments