माटरगाव येथे ४ एप्रिल च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ करीत एकाच दिवशी ४ घरांचे कडी कोंडे तोडून घरामध्ये प्रवेश करून व घरातील कपाटे फोडून कपाटामध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रकमेसह एकूण ६ लाख ४४ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी जलंब पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत वृत्त असे की जलंब पो. स्टेअंतर्गत येत असलेल्या माटरगाव ता. शेगाव येथील रहिवाशी अमित अनंता आळशी, विठ्ठल शंकरराव गाडे, गजानन कानडे, विष्णू फूटवाईक यांच्या घराच्या दरवाजाचे कडी कोंडे तोडून व घरामधील असलेले कपाटे फोडून कपाटामध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रकमेसह लाखो रुपयाचा
मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील रहिवासी अमित अनंता आळशी यांच्या घरामध्ये चोरट्यांनी प्रवेश करून कपाटामध्ये ठेवलेले एक नाकातील नथ, चार सोन्याच्या बांगड्या, एक सोन्याचा नेकलेस,
सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची गहू पोत, सोन्याची एकदानी, सोन्याचा गळ्यातील गोप, सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे कानातले असा एकूण १७४ ग्रॅम यासह एक चांदीचे ताट, चांदीचे शिक्के व नगदी रोकड असा एकूण ५ लाख ६५ हजार रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला तसेच विठ्ठल शंकर गाडे, गजानन लक्ष्मण कानडे, विष्णू फूट वाईक यांच्या घराचे कडी कोंडे तोडून त्यांच्या घरामध्ये प्रवेश करून घरातील कपाटामध्ये असलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ७९ हजार
२०० रुपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी फिर्यादी अमित आळशी व विठ्ठल गाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जलंब पोलिसांनी अज्ञात चोरट्या तिरुद्ध अप नं /४/२५ कलम
३३१,३०५ (A) BNS अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार अमोल सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुनील देव करीत
आहे

Post a Comment
0 Comments