नितीन वाकोडे मुख्य संपादक कामगार संघटक न्यूज
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी
मंडळातील नोंदीत बांधकाम कामगारांना शासन विविध
योजनांच्या माध्यमातून लाभ देत असते. त्यांच्यासाठी
सामाजिक सुरक्षेच्या विविध कल्याणकारी योजनाही राबविते.
बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी ९० दिवसाचे
बांधकाम क्षेत्रासंबंधीत काम केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक
असते. हे ९० दिवसाचे प्रमाणपत्र देण्याची सोपी आणि
सुटसुटीत पद्धत करावी, असे निर्देश कामगार मंत्री अँड.
आकाश फुंडकर यांनी या संदर्भातील बैठकीमध्ये दिले.
बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन,
ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विकास
आयुक्त (असंघटीत कामगार) तुकाराम मुंढे आदी उपस्थित
होते.

Post a Comment
0 Comments