मुख्य संपादक कामगार संघटक् नितीन वाकोडे मो न 9975969205
बुलडाणा कामगार संघटक न्यूज: बुलढाणा जिल्ह्यातील दोन गुंडांना एमपीडीए कायद्या अंतर्गत स्थानबद्ध
करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या विशेष पोलीस वार्तापत्रात याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
- समाधान सिताराम पंडित (४२, रा. अंत्री तेली, ता. बुलडाणा) व2) शेख शकील शेख शकुर (३१, रा. माटरगाव, खुर्द ता. शेगाव) अशी स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपींच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे अशा धोकादायक प्रवृत्तीच्या आरोपींच्या विरोधात MPDA कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक, व अप्पर पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हातभट्टी दारू व वाळूतस्करी या शीर्षकाखाली आरोपींना एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपी समाधान पंडित याला अकोला येथील कारागृहात तर शेख शकील याला येरवडा कारागृहात ठेवण्यात येणार आहे.

Post a Comment
0 Comments