नितीन वाकोडे मुख्य संपादक कामगार संघटक न्यूज मो-9975969205
एका आठवड्यात 4 बाल विवाह थांबविल्याची नोंद
सविस्तर माहिती अशी महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार अंतर्गत बालकांच्या मदतीसाठी 24 तास चालनारी राष्ट्रीय आपत्कालीन सेवा चाईल्ड हेल्पलाईन लाईन 1098 वर सकाळी 9.30 वाजताच्या सुमाऱ्यास माहिती प्राप्त झाली की, माना पोलीस स्टेशन च्या हद्दीत एका गावा मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील एका अल्पवयीन बालिकेचा बाल विवाह होणार आहे त्यासाठी मदतीचा कॉल आला. याबाबत ची माहिती बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्ष अकोला यांना देऊन तात्काळ चाईल्ड लाईन समन्वयक हर्षाली गजभिये आणि ॲसेस टु जस्टीस प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक शंकर वाघमारे यांनी माना पोलीस स्टेशन गाठले व पोलीस निरीक्षक सूरज सुरोशी यांच्या शी बाल विवाह थांबविण्याबाबत चर्चा करून लग्न स्थळ गाठले तेव्हा लग्नाची पूर्णतः तयारी झाली होती, वधू मंडप सजला होता. तसेच जवळ पास 200 हुन अधिक वऱ्हाडी पाहुणे जमले होते. त्याच प्रमाणे जेवणाची सुद्धा व्यवस्था पूर्ण झाली होती. परंतु जेव्हा त्याठिकाणी संबधीत यंत्रणा पोहचली तेव्हाच बालिकेला तिच्या आई व वडिलांनी सोबत घेउन त्या ठिकाण्यावरून पळ काढला. नरदेवा कडील सर्व मंडळींना बालविवाह प्रतिबंधक कायद्या 2006 बदल माहीती दिली. मुली चे वय १८ वर्ष पुर्ण झाल्याशिवाय मुलींचे लग्न करता येत नाही असे सांगितले व सर्वांचे समुपदेशन केले. त्यानंतर बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी ग्राम विकास अधिकारी भगत यांनी वधू व वरा कडील आई वडिलांच्या नावे नोटीस काढून बालिके सह मा. बाल कल्याण समिती अकोला येथे उपस्थित राहण्याबाबत नोटीस बजावली. मुलीला / मुलाला व सर्व नातेवाईकांना बाल कल्याण समिती अकोला यांचे समक्ष सादर करण्यात आले. बालकल्याण समितीने मुली चे वय १८ वर्ष पुर्ण झाल्याशिवाय लग्न न करण्याबाबतचे हमी पत्र बालिकेचे व मुलाच्या आई वडिलांकडून ह्म्मी पत्र लिहून घेतले त्यावेळी ग्राम सचिव,सरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका यांची साक्ष घेण्यात आली. बालविवाह थांबविण्यासाठी मार्गदर्शन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर यांचे लाभले. बाल विवाह थांबविण्यासाठी मोलाचे कार्य चाईल्ड हेल्पलाईन लाईन समन्वयक हर्षाली गजभिये, ॲसेस टु जस्टीस प्रकल्प आय. एस. डब्ल्यू. एस चे जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे, पोलीस निरीक्षण सूरज सुरोशी, सहकर्मी संदीप सरोदे, जावेद खान यांनी मोलाचे कार्य केले.

Post a Comment
0 Comments