मुख्यसंपादक :- नितीन सूर्यभान वाकोडे ९९७५९६९२०५
बांधकाम कामगार जन जागरण अभियान संघटनेची आडसुळ शाखा ३१/०८/२०२५ रविवार रोजी गठीत करण्यात आली संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत मेश्राम यांचे मार्गदर्शनात महासचिव विनोद जपसरे,सचिव मनोज बाविस्कर,कोषाध्यक्ष आत्माराम साठे,राज्य संघटक नितीन वाकोडे,अकोला तालुका.प्रमुख सचिन खराटे,कामगार संघटक चे उपसंपादक नागेश नेमाडे,प्रसिध्दी प्र.गणेश सावळे,गणेश राठोड,सत्यदेव तायडे हिवरखेड,संजय कठोरे,व या कामगार मेळाव्याचे आयोजक विलास रायबोले प्रामुख्यांने हजर होते. शाखाध्यक्ष म्हणुन विजय तायडे,यांची निवड करण्यात आली. प्रास्ताविक हिवरखेड शाखा प्रमुख सत्यदेव तायडे यांनी केले.विनोद जपसरे,आत्माराम साठे,नागेश नेमाडे,गणेश सावळे,विलास रायबोले यांची समोचित भाषणे झाली.या सर्वांनी दलाल/ एजंट यांचे पासुन सावध राहुन खर्या कामगारासाठी लढणारी संघटनी बिल्डींग पेंटर बांधकाम व इतर असंघटीत मजूर संघचे सभासद होण्याचे आव्हान केले.मुख्य मार्गदर्शक संघटनेचे अध्यक्ष मान.प्रशांत मेश्राम यांनी मंडळा मार्फंत देण्यात येणार्या योजना पैकी काही बंद करण्याचा मंडळाचा डाव असुन त्या सुरळीत सुरु राहण्यासाठी लढा देणे गरजेचे आहे व मुलीच्या लग्नाचा लाभ हा कामगारांच्या दोन मुलींनसाठी देण्यात यावे,दिवाळी बोनस हा कामगाराची दिवाळा काढणारा ठरला असल्याचे भाषणात सांगीतले जर आपण संघटीत झालो नाही तर हे मंडल लवकरच बडघाईस येण्यात येईल व कोणतीही योजना हि फक्त ठेक्यात देऊन कमीशसाठी असल्याचे म्हटले केंद्र सरकारचे ई प्रशासन धोरण मंडळाने लागु करुन लाभ हा DBT पध्दतीने देण्यात यावा.
शैक्षणिक लाभ हा दुप्पट करण्यात यावा व घरकुल चा लाभाच्या अटी शिथील करुन ते संपुर्ण महाराष्र्टात प्रभाविपणे लागु करण्यासाठी मोठा लढा संघटनेच्या माध्यमातुन उभारणार असल्याचे स्पष्ट केले.निवृत्ती योजना हि लबाडाच आवतण दिसते व या आम्हा सर्व नोंदणीकृत कामगारांना वय ६० नंतर तात्काळ देण्यात यावे व ईतर लाभ सुध्दा महीना भराच्या आत देण्यात यावे हि भुमिका स्पष्ट केली.सुत्रसंचालन राज्य संघटक नितीन वाकोडे यांनी केले व आभार गणेश राठोड यांनी मानले
या प्रसंगी गावातील महीला पुरुष हे कृषी उत्पन्न बाजार समीती चे आवार आडसुळ येथे प्रामुख्यांने हजर होते

Post a Comment
0 Comments