मुख्यसंपादक:-नितीन सूर्यभण वाकोडे ९९७५९६९२०५
कृष्णापुर येथे वीज व पाणीपुरवठा खंडित
---- ग्राम पंचायत प्रशासनाची डोळेझाक
बाभूळगाव | प्रतिनिधी :-
तालुक्यातील कृष्णापुर (गट ग्रामपंचायत पंचगव्हाण) येथे जुन्या वस्तीपासून नवीन प्लॉट भागातील खांबावरील वीज लाईट गेल्या ८ दिवसांपासून बंद आहेत. गावात तीन पाण्याच्या टाक्या असताना आठ–आठ दिवस नळातून पाणी येत नाही. येथील ग्राम पंचायत प्रशासन मात्र या गंभीर समस्येकडे डोळेझाक करीत आहेत. कृष्णापुर गावातील समस्यांचे तत्काळ निवारण करावे अशी मागणी येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते रत्नपाल डोफे यांनी निवेदनातून गट विकास अधिकारी यांना केली आहे.
येथील समस्यांकडे ग्रामपंचायत सरपंच, सचिव, सदस्य लक्ष देत नाहीत. नागरिकांना पाणी व प्रकाशासारख्या मूलभूत सोयीपासून वंचित ठेवले जात आहे. ग्रामस्थांच्या हक्काचे पाणी बंद होणे व गावात अंधार पसरणे ही अत्यंत गंभीर तसेच लोकहिताच्या दृष्टीने धोक्याची बाब आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार येथील नागरिकांनी सांगितले. मात्र त्यांच्या उदासीनतेपुढे सर्व हतबल झालेले आहे. वरिष्ठ शासन व प्रशासनाने याची तत्काळ दखल घेऊन सरपंच, सचिव व संबंधित ग्रामपंचायत सदस्य यांच्या कारभाराची चौकशी करून आवश्यक ती कठोर कारवाई करावी. तसेच वीज व पाणीपुरवठा तत्काळ सुरु व्हावा, अशी मागणी रत्नपाल गोवर्धन डोफे यांनी केली आहे.
Post a Comment
0 Comments