मुख्यसंपादक:- नितीन सूर्यभान वाकोडे ९९७५९६९२०५
शेगाव तालुका प्रतिनिधि
शेगाव :- बाळापूर तालुक्यातील एक लाचखोर तलाठ्यावर कारवाई होते न होते तोच अकोला एसीबीच्या पथकाने बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील दोन लाचखोर तलाठ्यांवर मंगळवारी (दि. ३०) कारवाई केली. त्यांचेवर शेगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे. अरुण डाबेराव, अमोल गिते अशी लाचखोर तलाठ्यांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार यांचा चुलत भाऊ यांची एक जेसीबी व एक टिप्पर तसेच इतर नातेवाईकांचे एक टिप्पर अशी तिन्ही वाहने रेती, माती, मुरुम वाहतूक करतात. १० सप्टेंबरला तलाठी अरुण डाबेराव, ग्राम माटरगाव यांनी ही वाहने पकडून तिन्ही वाहन अवैध मुरुम उत्खनन करण्यासाठी जात असल्यामुळे मी त्यांचेवर कायदेशीर कारवाई करुन वाहने शेगाव तहसील कार्यालयात लावतो, असे सांगितले. जर कारवाई न करता वाहने सोडून द्यायचे असेल तर तुम्ही मला ५० हजार रुपये द्या, अशी लाचेची मागणी केली. त्यावेळी १९ हजार रुपये दिले व उर्वरित ३१ हजार रुपये सकाळी आणून देतो, असे सांगितले. परंतू तक्रारदारास उर्वरित लाच रक्कम द्यायची नसल्याने त्यांनी ११ सप्टेंबरला एसीबी कार्यालय, अकोला येथे तक्रार नोंदवली. त्यानुषंगाने पंचासमक्ष १२ सप्टेंबरला मागणी पडताळणी कारवाई आजमावली असता अरुण डाबेराव यांनी तडजोडीअंती २० हजार रुपये लाच रकमेची मागणी करुन सदरची रक्कम ही तलाठी अमोल गिते यांची असल्याचे सांगितले. त्यावरुन २२ सप्टेंबरला तलाठी अमोल गिते यांनी तक्रारदार यांना अरुण डाबेराव यांनी तक्रारदाराकडे मागणी केलेल्या लाच रक्कमेस दुजोरा देवून रक्कम प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी सापळा कारवाई दरम्यान तलाठी अरुण डाबेराव यांनी लाच स्विकारण्यास टाळाटाळ केली. आरोपींना तक्रारदाराच्या हालचालींवर संशय आल्याने लाच स्विकारण्यास टाळाटाळ करीत असल्याचे तक्रारदाराने सांगितल्याने मंगळवारी (दि. ३०/९/२०२५ ) आरोपी तलाठी अरुण डाबेराव व तलाठी अमोल गिते यांना ताब्यात घेवून आरोपींविरुद्ध शेगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
------------------------------
यांनी केली सदर कारवाई
सदर कारवाई एनटि करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे, अकोल्याचे पोलिस उप अधीक्षक मिलिंदकुमार बहाकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रविण वेरुळकर, पोकॉ डिगांबर जाधव, निलेश शेगोकार, असलम शहा, गोपाल किरडे, शालु हंबर्डे व चालक सलीम खान यांनी केली.
-------------------------------

Post a Comment
0 Comments