मोबाईल शॉपी फोडून १२ हजारांचा ऐवज लंपास; दोन संशयित अटक
माटरगाव बु./प्रतिनिधी शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असलेल्या मोबाईल शॉपीचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून चोरी केल्याची घटना २० एप्रिलच्या पहाटे उघडकीस आली मंगेश श्रीकृष्ण बोराखडे (३४)यांचा मोबाईल शॉपीचा व्यवसाय आहे. यांनी जलंब पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या जय मातादी मोबाईल शॉपीत जिओ आणि इतर लहान मोबाईल तसेच विविध अॅक्सेसरीज ठेवण्यात आले होते. १९ एप्रिलच्या रात्री सुमारे ११.३० वाजता त्यांनी दुकान बंद करून घरी गेले होते. २० एप्रिल रोजी सकाळी सुमारे ५ वाजता टपरीवर आल्यानंतर कुलूप तोडलेले व दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पहाटे २.४२ वाजता ३० ते ३५ वयोगटातील अज्ञात इसमाने तोंड बांधून दुकानात चोरी करताना दिसून आला. चोरट्यने गल्लूयातील ४,५०० रुपये रोख, तीन जिओ मोबाईल अंदाजे ३,५०० रुपये तसेच ब्लूटूथ, हेडफफोन व स्पीकर अंदाजे ४,००० रुपये असा एकूण सुमारे १२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी जलंब पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे दोन संशयित आरोपी यांना अटक करण्या आली आहे या घटनेचा तपास ठाणेदार अमोल सांगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक नरवाडे साहेब करीत आहे
Post a Comment
0 Comments