Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न.**

 *


कार्यकारी संपादक   नम्रता पं. जवरे मुख्य संपादक नितीन वाकोडे उप संपादक नागेश नेमाडे












*माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न.** 


दि. एप्रिल 18 

                     धामणगाव रेल्वे -माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशन द्वारे आयोजित RTI जनजागृती कार्यक्रम धामणगाव रेल्वे येथे 18 एप्रिल रोजी संपन्न झाला . कार्यक्रमाचे आयोजन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ टीम धामणगाव रेल्वे यांनी केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत माहितीचा अधिकार कशाप्रकारे पोहोचला जाईल हा त्या कार्यक्रमाचा उद्देश होता माहितीचा अधिकार हा कशाप्रकारे व कोठे लागू होतो. या संदर्भात RTIजनजागृती  कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले माहितीचे अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे अध्यक्ष , माननीय सुभाष बसवेकर सर. तसेच पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष श्री निलेश केवट. त्याचप्रमाणे माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे विदर्भ प्रमुख व बिल्डिंग पेंटर बांधकाम संघटनेचे संस्थापक  अध्यक्ष माननीय प्रशांत मेश्राम  यांची  सुद्धा प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती

आरटीआय अधिनियम 15 जून 2005 मध्ये संसदेने या कायद्याला मंजुरी दिली.

या कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथींनी आपल्या भाषणाद्वारे समाजातील तळागाळातील लोकांना आरटीआयचे महत्त्व अत्यंत सोप्या पद्धतीने पटवून देण्याचा प्रयत्न केला व समाजामध्ये आरटीआय संबंधित जनजागृती करण्याचे अनमोल असे काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती अधिकार कार्यकर्ता संघ धामणगाव रेल्वे यांनी केले.

आरटीआय चा वापर कसा करावा कशा संदर्भात करावा हे त्यांनी समजावून सांगितले. आरटीआय म्हणजेच माहितीचा अधिकार एखाद्या व्यक्तीला सरकारी कामकाजाबद्दल एखाद्या शासकीय कामाविषयी माहिती हवी असेल तर ती व्यक्ती दहा रुपयाच्या पावती वरती सर्व माहिती मागवू शकते व ती  माहिती ज्या व्यक्तीने अर्ज केला त्या व्यक्तीला शासकीय कार्यालयाला द्यावीच लागते. व आर टी आय नुसार एखादी माहिती ३० दिवसाच्या आत त्या व्यक्तीला द्यावीच लागते.अशाप्रकारे मोलाचे मार्गदर्शन     मा. सुभाष बसवेकर सर ,   श्री. निलेश केवट ,मा. प्रशांत मेश्राम यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजक धीरज भोसरे,  मनोज सापेकर ,मेघाताई भोयर ,शेख नासिर शेख मुसा ,विनोद कोष्टी ,गोवर्धन ढगे ,कैलास ढोले, अमित राजूरकर ,आशिष बनारसे ,गौरव शेंडे ,चंद्रपाल रंगारी ,विलास अवघड ,सचिन अशोकराव मून ,शुभांगी पंकज गोमासे ,नालंदा प्रकाश ढंगारे, नागोराव गजानन नेमाडे. नितीन वाकोडे विदर्भ विभाग उपाध्यक्ष बिल्डिंग पेंटर बांधकाम व इतर असंघटित मजूर संघ महाराष्ट्र राज्य संघटक इत्यादी आयोजकांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. असून अत्यंत उत्कृष्ट रित्या कार्यक्रम पार पाडला. तसेच कार्यक्रमाला हजारो च्या संख्येने उपस्थिती होती.

                       कार्यकारी संपादक   नम्रता पं. जवरे मुख्य संपादक नितीन वाकोडे उप संपादक नागेश नेमाडे

Post a Comment

0 Comments