Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

माटरगाव तालुका शेगाव ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियान संपन्न ..!

 शेगाव, दि. 15 मे २०२६

 माटरगाव  तालुका शेगाव ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियान संपन्न ..!

 
शेगाव: नागरिकांना एकाच छताखाली पारदर्शक आणि त्वरित शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाचा (टप्पा-१) आज राजस्व मंडळ माटरगाव  येथे मोठ्या उत्साहात समारोप झाला. जिल्हा परिषद शाळा माटरगाव येथे आयोजित या शिबिराला माटरगाव राजस्व मंडळ  व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
उपस्थित मान्यवर:
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलडाणा जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी  श्री. सदाशिव शेलार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार प्रद्न्या काकडे मॅडम, भूमिअभिलेख उपअधीक्षक श्री. रवींद्र सोनार, तालुका आरोग्य अधिकारी पाटील मॅडम, माटरगाव चे माजी जि. प्. सदस्य राजूभाऊ देवचे, अध्यक्ष कृषी बाजार समिती गोपाळ मिरगे, सरपंच इनायत खान,राजु भाऊ मुरे तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि सेतू व आधार केंद्र संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरातील प्रमुख लाभ:
या शिबिराद्वारे शेकडो नागरिकांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
महसूल विभाग: 69 फेरफार नोंदी, 411  डिजिटल ७/१२ चे वाटप आणि ७/१२ दुरुस्तीसाठी 29 अर्ज स्वीकारण्यात आले.
प्रमाणपत्रे व कार्ड वाटप: 350 लाभार्थ्यांना विविध दाखले/प्रमाणपत्रे, 26 लाभार्थ्यांना नवीन/दुरुस्त रेशनकार्ड, तर 39 लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले.
समाज कल्याण व गृहनिर्माण: संजय गांधी निराधार योजनेचे 33 लाभार्थी.  तसेच बेबी केअर किट 18 चे वाटप करण्यात आले..
कृषी विभाग:  6 लाभार्थ्यांना शेती अवजारांचे वाटप करण्यात आले.
अनेक सुविधांची उपलब्धता:
शिबिरात केवळ लाभ वाटपच झाले नाही, तर जमीन जोडणी, शेतकरी ओळख क्रमांक तयार करणे, ई-मोजणी अर्ज, लक्ष्मी मुक्ती व सलोखा योजना अर्ज, लाडकी बहीण योजना केवायसी आणि आधार कार्ड अद्ययावत करणे यांसारख्या सुविधाही एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
मार्गदर्शन व आवाहन:
याप्रसंगी कृषी विभागातर्फे पीक पेरणीबाबत तर पंचायत समितीमार्फत शेत सिंचन विहीर योजनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
उपजिल्हाधिकारी पुनर्वसन अधिकारी श्री. सदाशिव शेलार साहेब यांनी नागरिकांना आवाहन केले की, सर्वांनी स्वगणना करून प्रशासनास सहकार्य करावे. तसेच १/१/२०११ पूर्वीचे अतिक्रमण नियमाकुल करणे आणि तुकडे बंदीमुळे प्रलंबित राहिलेल्या खरेदीची नोंद घेणे यांसारख्या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. महसूल विभागासोबत इतर सर्व शासकीय कार्यालय यांनी सध्या सुरू असणाऱ्या शासकीय योजनाची माहिती देण्यात आली.. मोठ्याप्रमाणात  संजय गांधी योजना लाभार्थी यांचे ऑनलाईन हयात प्रमाणपत्र करण्यात आले..
यावेळी उभारण्यात आलेल्या जनगणना कक्षात 49 नागरिकांनी आपली स्वगणना पूर्ण केली.
तहसीलदार कार्यालयाने माटरगाव मंडळातील सर्व नागरिकांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्याबाबत आवाहन केले तसेच समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहेत...

Post a Comment

0 Comments