शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी विमल गुटखा व पान मसाल्याची अवैध रित्या वाहतूक करणारे
टाटा मालवाहतूक गाडीला जलंब पोलिसांनी पकडले असून विमल गुटख्यासह 38 लाख 68 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आहे. सदर घटना दि 10 एप्रिल रोजी जलम पोस्ट अंतर्गत येत
असलेल्या लांजुळ फाट्या नजिक घडली आहे .. जलंब पोस्ट अंतर्गत येत असलेल्या लांजुळ फाट्या
नजिक टाटा अल्ट्रा कंपनीचे मालवाहू वाहनातून अवैध रित्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती जलंब पोलिसांना मिळाली यावरून पोलिसांनी नाकाबंदी करून टाटा कंपनीची मालवाहू गाड़ी पकडली असून त्या गाडीमधून शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित विमल गुटखा व पान मसाला किं 23 लाख 68 हजार 80 रुपयांचा व टाटा टाटा अल्ट्रा कंपनीची मालवाहू गाडी किं.15 लाख असा एकूण 38 लाख 68 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जलंब पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी फिर्यादी गुलाबसिंग वसाने अन्न सुरक्षा अधिकारी यांनी दिलेले तक्रारीवरून आरोपी समीर अमीर खान रा. चंदन नगर इंदौर, गोवर्धन मायाराम सेन रा. सोटन, हरी किसन राधेशा पांचाळ रा. मालखेड़ी जिल्हा उज्जैन यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 223,274,275,123 सह अन्न व सुरक्षा कायदा 2006 अन्वे गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अमोल सांगळे, पीएसआय सुनील देव, संदीप गावंडे, सचिन बावणे, गोविंदा होनमाने,शेख अंजुम,रवी गायकवाड आदींनी केली आहे ..


Post a Comment
0 Comments