बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळच्या घट मांडणीचं भाकीत जाहीर झालं आहे. चंद्रभान महाराजांचे वंशज सारंगधर महाराज यांनी घट मांडणीचं निरीक्षण करून यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली.
नितीन वाकोडे मुख्य संपादक कामगार संघटक न्यूज मो-9975969205
बुलढाणा :
जवळपास 300 वर्षांची परंपरा असलेली भेंडवळची भवि्ष्यवाणी गुरुवारी जाहीर
झाली. शेतकरी वर्गांपासून ते राजकीय क्षेत्रासह इतर विविध क्षेत्रातील
मंडळी या भविष्यवाणीकडं लक्ष ठेवून असतात. अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या
दिवशी भेंडवळची भविष्यवाणी जाहीर झाली. भेंडवळच्या घट मांडणीला राज्यासह
इतर राज्यातील शेतकरी वर्ग, नागरिक उपस्थित होते.
भेंडवळच्या घटमांडणीचं काय भाकीत? :
या भविष्यवाणीत येणारे पीक, पाऊस आणि नैसर्गिक संकटे यावर भाष्य करण्यात
आलं. यावर्षी पीक, पाणी सामान्य असून, कापूस पिकावर रोगराई जास्त असेल, तर
इतर पिके साधारण येतील. यात गहू, हरभरा, उडीद मूग, ज्वारी, तूर या
शेतीमालाला भाव मिळणार नाही, मंदी असेल, असा भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज
आहे.
यंदा पाऊस कसा असेल? :
जुलै महिन्यात भरपूर पाऊस, ऑगस्टमध्ये नुकसान करणारा पाऊस पडेल तर
सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस असेल. यंदा देशात पूर, भूकंप या आपत्तीचं प्रमाण
जास्त असेल. त्यामुळं पावसाबाबत शेतकऱयांना चिंता करण्याची गरज नसल्याचं
यातून दिसून येत आहे. यंदा पिके साधारण राहणार असून, पावसाळा चांगला असेल,
अशीही भविष्यवाणी वर्तवण्यात आली.
भारत - पाकिस्तानात युद्ध होणार? :
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव आहे. त्यामुळं
येत्या काळात युद्ध होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. यावर देखील
भेंडवळच्या भविष्यवाणीत भाष्य करण्यात आलंय. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध
होणार नाही. मात्र, देशात तणावाचं वातावरण असेल. तसंच देशात मोठ्या
प्रमाणात आर्थिक टंचाई असेल. तसंच परकीय शत्रूपासून मोठा त्रास वाढणार आहे,
अशी भविष्यवाणी वर्तवण्यात आली.
कशी केली जाते घटमांडणी? :
आपल्या दैनंदिन रोजच्या जीवनामध्ये वापरात असलेल्या वस्तूंपासून घटमांडणी
केली जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी जळगाव जामोद तालुक्यातील
गावाबाहेर बस स्टॅन्ड शेजारच्या शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात येते.
घटामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, बाजरी,
तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर, करडी इत्यादी अठरा प्रकारची धान्य
ठेवण्यात येतात. घटाच्या मध्यभागी मातीची ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेली
घागर ठेवतात. पानसुपारी, पुरी, पापड, सांडोळी- कुरडई हे खाद्यपदार्थ ठेवले
जातात. रात्रभर त्या ठिकाणी कोणीही थांबत नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे या
घटांमध्ये झालेल्या बदलाचं निरीक्षण केलं जातं.
शास्त्रीय आधार आहे का किंवा यावर विश्वास ठेवावा का? :
आजच्या आधुनिक आणि डिजिटल हायटेक युगात जवळपास 300 वर्षापेक्षा जास्त काळ
सुरू असलेली ही परंपरा आजही जोपासली जात आहे. अत्यंत साध्या पद्धतीनं
येणारे वर्ष कसे जाणार हे अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी जाहीर करण्यात
येते. यावर वेगवेगळे मतप्रवाह देखील आहेत. मात्र, शेती संदर्भात असू द्या,
किंवा येणारे संकट याला आपल्या पद्धतीने सर्वजण सामोरे जातात आणि त्यातून
मार्ग काढतात. त्यामुळं श्रद्धा की अंधश्रद्धा, विश्वास आणि मार्ग असा
समतोल ठेवत या घटमांडणीकडं पाहायला हरकत नाही. एकंदरीत दरवर्षी अक्षय्य
तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या घटमांडणीबाबत कोणी उघडपणे बोलत नसलं तरी
याची आतुरता आजही कायम आहे.
बुलढाणा : जवळपास 300 वर्षांची परंपरा असलेली भेंडवळची भवि्ष्यवाणी गुरुवारी जाहीर झाली. शेतकरी वर्गांपासून ते राजकीय क्षेत्रासह इतर विविध क्षेत्रातील मंडळी या भविष्यवाणीकडं लक्ष ठेवून असतात. अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी भेंडवळची भविष्यवाणी जाहीर झाली. भेंडवळच्या घट मांडणीला राज्यासह इतर राज्यातील शेतकरी वर्ग, नागरिक उपस्थित होते.
भेंडवळच्या घटमांडणीचं काय भाकीत? : या भविष्यवाणीत येणारे पीक, पाऊस आणि नैसर्गिक संकटे यावर भाष्य करण्यात आलं. यावर्षी पीक, पाणी सामान्य असून, कापूस पिकावर रोगराई जास्त असेल, तर इतर पिके साधारण येतील. यात गहू, हरभरा, उडीद मूग, ज्वारी, तूर या शेतीमालाला भाव मिळणार नाही, मंदी असेल, असा भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज आहे.
यंदा पाऊस कसा असेल? : जुलै महिन्यात भरपूर पाऊस, ऑगस्टमध्ये नुकसान करणारा पाऊस पडेल तर सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस असेल. यंदा देशात पूर, भूकंप या आपत्तीचं प्रमाण जास्त असेल. त्यामुळं पावसाबाबत शेतकऱयांना चिंता करण्याची गरज नसल्याचं यातून दिसून येत आहे. यंदा पिके साधारण राहणार असून, पावसाळा चांगला असेल, अशीही भविष्यवाणी वर्तवण्यात आली.
भारत - पाकिस्तानात युद्ध होणार? : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव आहे. त्यामुळं येत्या काळात युद्ध होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. यावर देखील भेंडवळच्या भविष्यवाणीत भाष्य करण्यात आलंय. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होणार नाही. मात्र, देशात तणावाचं वातावरण असेल. तसंच देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक टंचाई असेल. तसंच परकीय शत्रूपासून मोठा त्रास वाढणार आहे, अशी भविष्यवाणी वर्तवण्यात आली.
कशी केली जाते घटमांडणी? : आपल्या दैनंदिन रोजच्या जीवनामध्ये वापरात असलेल्या वस्तूंपासून घटमांडणी केली जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी जळगाव जामोद तालुक्यातील गावाबाहेर बस स्टॅन्ड शेजारच्या शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात येते. घटामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर, करडी इत्यादी अठरा प्रकारची धान्य ठेवण्यात येतात. घटाच्या मध्यभागी मातीची ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवतात. पानसुपारी, पुरी, पापड, सांडोळी- कुरडई हे खाद्यपदार्थ ठेवले जातात. रात्रभर त्या ठिकाणी कोणीही थांबत नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे या घटांमध्ये झालेल्या बदलाचं निरीक्षण केलं जातं.
शास्त्रीय आधार आहे का किंवा यावर विश्वास ठेवावा का? : आजच्या आधुनिक आणि डिजिटल हायटेक युगात जवळपास 300 वर्षापेक्षा जास्त काळ सुरू असलेली ही परंपरा आजही जोपासली जात आहे. अत्यंत साध्या पद्धतीनं येणारे वर्ष कसे जाणार हे अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी जाहीर करण्यात येते. यावर वेगवेगळे मतप्रवाह देखील आहेत. मात्र, शेती संदर्भात असू द्या, किंवा येणारे संकट याला आपल्या पद्धतीने सर्वजण सामोरे जातात आणि त्यातून मार्ग काढतात. त्यामुळं श्रद्धा की अंधश्रद्धा, विश्वास आणि मार्ग असा समतोल ठेवत या घटमांडणीकडं पाहायला हरकत नाही. एकंदरीत दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या घटमांडणीबाबत कोणी उघडपणे बोलत नसलं तरी याची आतुरता आजही कायम आहे.
Post a Comment
0 Comments