५ जून २०२५ नंतर मुख्य कार्यालयास घेराव आंदोलन करण्यात येईल
शेगाव
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समितीच्या वतीने आम्ही वेळोवेळी शिष्टमंडळ भेटण्यासाठी वेळ तारिखची मागणी करत आलो आहोत. परंतु आम्हाला भेटण्यासाठी वेळ तारीख दिली जात नाही. तसेच पत्राचे कोणतेही उत्तर मिळत नाही. तरी आम्ही पुन्हा पुन्हा पत्र व्यवहार करत आहोत. ईमेल आयडी वर आणि प्रत्येक्ष कार्यालयात येऊन दिलेली आहेत. आता ही दिल्या नंतर ३१ मे पर्यन्त खालील विषयावर स्वतंत्र कृती समितीच्या शिष्टमंडळास चर्चेसाठी न बोलवल्यास ५ जून २०२५ नंतर आपल्या मुख्य कार्यालयास घेराव आंदोलन करण्यात येईल. यांची कृपया नोंद घेण्यात यावी.
चर्चेसाठी प्रमुख मागण्या
१) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात अधिकारी व कर्मचारी यांची त्वरित भरती करावी.
२) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात 'ई' प्रशासन धोरण लागु करण्यात यावे.
३) अनावश्यक व चुकीची त्रुटी काढून लाभाचे अर्ध रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची तरतूद करावी.
४) मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या भांडी किट, पेटी व सुरक्षा संच ठेकेदारा मार्फत न देता त्या ऐवजी भांडी, पेटी व सुरक्षा संच ची रक्कम कामगाराच्या खात्यात आर.टी.जी.एस पद्धतीने जमा करण्यात यावी.
५) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर मालक प्रतिनिधी व कामगार प्रतिनिधीची तात्काळ नियुक्तीकरावी. व मंडळावर महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समितीचे प्रतिनिधी घेण्यात यावे.
६) मंडळाच्या दैनंदिनी कामात (ज्यामध्ये नोंदणी, नूतनीकरण, विविध लाभाचे अर्ज दाखल करणे) बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या नोंदणीकृत (ट्रेड युनियन अॅक्ट १९२६ नुसार) कामगार संघटनांना विश्वासात व सोबत घेऊन काम करावे.
७) मंडळाच्या कामांमध्ये गतिमानता व पारदर्शकता येण्यासाठी जिल्हास्तरावर कमिटी गठीत करावी.
८) तालुका कामगार सेवा केंद्र भ्रष्टाचारचे केंद्र झाले आहेत. ती तत्काल बंद करण्यात यावी.
९) कर्नाटक, राजस्थान राज्याच्या धर्तीवर नोंदणीकृत, व लाभार्थी कामगारांची नांव, गांव, रक्कम पोर्टल वर जाहीर करावी.
१०) सेवा हमी कायदा लागु करण्यात यावा.
मुख्य संपादक नितीन वाकोडे मो 9975969205
कामगार संघटक मुख्य संपादक मान नितीन वाकोडे यांचे हार्दिक अभिनंदन. महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समिती च्या वतीने इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या मुख्य कार्यालयाला ५ जून नंतर घेराव आंदोलन करणार आहे. त्यात ७० बांधकाम कामगार संघटनेचे प्रत्येकी तीन पदाधिकारी भाग घेतील. सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत आम्ही शांत बसणार नाही.
ReplyDelete